L&T अमेरिकेतील 'Together AI' साठी चेन्नईमध्ये भारतातील सर्वात मोठा Nvidia B300 AI कारखाना उभारणार आहे.
ठळक मुद्दे:
- लार्सन अँड टुब्रो (L&T) ने आपल्या 'LTN Compute' या AI पायाभूत सुविधा विभाग आणि 'Vyoma.AI' अर्थात डेटा सेंटर व्यवसाय यांच्या माध्यमातून अमेरिकेतील 'Together AI' (Together Computer, Inc.) साठी भारतातील सर्वात मोठा 'सिंगल-क्लस्टर NVIDIA B300 AI कारखाना' उभारणार आहे.
- यासाठी १०,००० ते १५,००० कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे.
- सदर प्रकल्प चेन्नई (तमिळनाडू) येथील 'Vyoma.AI' च्या डेटा सेंटर कॅम्पसमध्ये उभारण्यात येणार आहे.